Control

First published on Facebook on 4th April 2023

आपल्याला सगळ्याच गोष्टींवर आपला “ताबा” हवा असतो ना?

आपल्या घरावर, आपल्या वस्तूंवर, परिस्थितीवर, आणि आपल्या माणसांवर सुद्धा.., सगळ्यावर आपला ताबा हवा.

आपल्या भावनांवर तेवढा आपला ताबा नसतो, असतो का? क्वचित असतो, बहुतेक वेळा नसतोच..! का असं?

मुळात सगळं आपल्या ताब्यात कशासाठी? सगळं घट्ट आवळलेलं.

जाऊदे ना, थोडं सैल सोडता आलं पाहिजे खरं तर, जमलं पाहिजे, पण जमत नाही, फार कठीण.

बरं आणि गोची अशी आहे कि जितकं जस्त वाटतं ताबा हवा, तितका ताबा सुटतच जातो.

उलट केलं तर? नकोच काही, मुक्त करूया, मुक्त राहूया, जे निसटेल ते नव्हतंच कधी आपलं.

आणि सैल सोडून सुद्धा जे आपल्याला बिलगले ते? तेच आपलं, तेवढंच आपलं, त्याचा ताबा असायची गरजच नाही.

कठीण आहेच पण पाहूया प्रयत्न करून.

Leave a comment